‘ही’ महिला स्वत:चे घाणेरडे मोजे, कपडे ऑनलाइन विकून लाखो कमवते

roxy
लडंन – आपल्या घाणेरड्या सॉक्स आणि कपड्यांमुळे येथे राहणारी रोक्सी स्काइस (३३) चर्चेत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाने वेबकॅम गर्ल असणारी रोक्सी तिचे मळके मोजे आणि कपडे विकून लाखोंची कमाई करते. मिररच्या एका रिपोर्ट्मध्ये तिने काही दिवसांपूर्वीच सांगितले, की ही महिला सुरुवातीला ऑनलाइन माध्यमातून आपल्या पायाचे फोटो शेअर करत ती त्यापासून चांगली कमाई करत होती. तिने गेल्या काही दिवसांत अशा माध्यमातून १ ते १.५ लाख पाउंड म्ह्जेच जवळपास दीड कोटी रुपये कमावले आहेत.

एका इंस्टाग्राम पेजपासून या अनोख्या बिझनेसची सुरुवात सुरू झाली. @fomf2roxy नावाचे रोक्सीने एक इंस्टाग्राम अकाउंट बनवले. ती त्या अकाउंटवर आपल्या पायांचे फोटो शेअर करु लागली. तिच्या सुंदर पायांचे फोटो पाहून तिचे हजारो फॉलोअर्स झाले. रोक्सी हळू-हळू आकर्षक फोटो शेअर करण्यासोबत पायांना सुंदर बनवण्याच्या टीप्स देऊ लागली.

रोक्सीच्या सौंदर्यामुळे अकाउंट उघडल्यानंतर एका महिन्यातच तिचे १० हजार फॉलोअर तयार झाले. पाहता त्यांची संख्या लाखोंमध्ये पोहचली. रोक्सीने सांगितले, नेहमीच माझ्या पायांची माझे मित्र स्तुती करत असायचे. मी सुरवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलोअर वाढवले पण मला कळू लागले की, माझ्या पायांचे लोक चाहते आहे, ते मला पाहण्यासाठी ऑनलाइन पैसे द्यायला तयार आहे. मी त्यानंतर वेगळ्या पद्धतीने काही पद्धतीने पैसे कमवू शकते हे मला समजले.

रोक्सीची फॅन फॉलोविंग अशी होती की, तिला पाहण्यासाठी सोशल मीडियावर लोक मागणी करु लागले. तिची भेट याचवेळी एका बिझनेसमनसोबत झाली. रोक्सीला त्या बिझनेसमनने आइडिया दिली, तिच्या फॅन फोलोविंगचा उपयोग करुन ती बिझनेस करता करु शकते. जर तिचे कपडे किंवा घाणेरडे सॉक्स जरी तिने विकले तरीसुद्धा ते विकले जातील. रोक्सीला पहिल्यांदा ही मस्करी वाटली पण तिने जेव्हा हे करुन पाहीले तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आइडिया कामी आली.

यानंतर तिच्यासोबत त्या बिझनेसमनने या गोष्टीला प्रमोट करण्यासाठी तिच्याकडून १० टक्के रक्कम देण्याची डील केली. रोक्सीने डीलनुसार २० पौंडमध्ये तिने वापरलेले सॉक्स, २०० पौंडमध्ये बूट आणि तिने वापरलेले कपडे ऑनलाइन विकण्यासाठी काढले. अवघ्या काही दिवसांत त्यांची विक्री झाली. रोक्सीच्या या वस्तूंना विकत घेणाऱ्यांनी सांगितले की, रोक्सीने वापरलेल्या वस्तूंपैकी कपड्याचा एक तुकडा सुद्धा आमच्यासाठी भाग्यशाली गोष्ट आहे.

रोक्सीने सांगितले, माझ्या वाढत्या वयाची भीती मला वाटत नाही, कितीही माझे वय वाढले तरी मी माझ्या पायांच्या माध्यमातून कमाई करु शकते. या व्यतिरिक्त रोक्सी अनेक मॉडेल्सला ट्रेनिंग देत आहे, कशाप्रकारे तुम्ही आपल्या पायांच्या माध्यमातून कमाई करु शकता याचे धडे ती त्यांना देत आहे.

Leave a Comment