हिरव्या भाज्यांप्रमाणेच लाल रंगाच्या भाज्याही आरोग्यास लाभकारी

vege
आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी लागणारी सर्वच पोषक तत्वे आपल्याला मुबलक मात्रेमध्ये मिळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण त्याचबरोबर लाल रंगाच्या भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये अनेक तऱ्हेची अँटीऑक्सिडंटस् असतात, जी शरीरातील अनेक घातक द्रव्य बाएह्र टाकण्यासाठी सहायक असतात. या भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये लायकोपिन, अँथोकॅनिन्स, इत्यादी तत्वे असून, ही तत्वे हृदयरोग आणि अनेक तऱ्हेच्या कर्करोगांपासून शरीराचे संरक्षण करीत असतात. भाज्या आणि फळांचे रंग जितके गडद, तितके त्यामध्ये क्षार, आणि जीवनसत्वे अधिक असतात.
vege1
बीटामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, फायबर, फोलेट, क जीवनसत्व आणि नायट्रेट ही तत्वे असतात. बीटाचे किंवा बीटाच्या पानांच्या रसाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित होऊन शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारते, तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. बीटामध्ये अ, क आणि के जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आहेत. लाल रंगाचे टोमॅटो, भाज्या, आमटी, तसेच कोशिंबिरीमध्ये वापरले जात असतात. यामध्ये लायकोपीनचे प्रमाण मुबलक असून, यामध्ये क जीवनसत्व आणि पोटॅशियम देखील मोठ्या प्रमाणात आहे. लायकोपिन हे तत्व कर्करोग प्रतिरोधक असल्याने टोमॅटोचा समावेश आहारामध्ये अवश्य व्हायला हवा.
vege2
थंडीच्या दिवसांमध्ये मिळणारी लाल गाजरे पोटॅशियम, फोलेट, झिंक, फॉस्फोरस, मँगनिझ, कॉपर, लोह आणि कॅल्शियम या सर्व तत्वांनी परिपूर्ण असतात. या व्यतिरिक्त गाजरामध्ये जीवनसत्वे ही आहेत. गाजरामध्ये डायटरी फायबर देखील मोठ्या मात्रेमध्ये आहे. लालबुंद दाण्यांनी भरलेले डाळिंब हे आरोग्यदायी पौष्टिक तत्वांचा खजिना म्हणून ओळखले जाते. ग्रीन टी पेक्षा तिप्पट जास्त अँटीऑक्सिडंटस् असणारे असे हे फळ आहे. याच्या रसाच्या सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. या फळामध्ये फायबर, जीवनसत्वे आहेत. याची साल खोकल्यावर गुणकारी आहे.
vege3
कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण मुबलक असते. ऑर्गनोसल्फर हे असे फायटोकेमिकल आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. याच्या सेवनाने कोलेस्टेरोलचे प्रमाण घटते. लिव्हर निरोगी ठेवण्यासही कांद्याचे सेवन उपयुक्त आहे. ज्यांना शारीरिक श्रम जास्त करावे लागतात, त्यांच्यासाठी कांद्याचे सेवन उत्तम आहे. कांद्याच्या नियमित सेवनाने शरीराला जीवाणूंच्या संसर्गांपासून संरक्षण मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment