ठरलं! या तारखेला रिलीज होणार ‘केजीएफ चॅप्टर 2’


‘केजीएफ चॅप्टर – 1’ला मिळालेल्या तुफान यश आणि लोकप्रियतेनंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वलची आतुरतेने वाट पाहत असल्यामुळेच नुकतीच ‘केजीएफ चॅप्टर 2’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार असून त्याचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता.


दाक्षिणात्य सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ ची रिलीज डेट समोर आली असून या चित्रपटाचे एक पोस्टर शुक्रवारी रिलीज करण्यात आले. या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला ‘केजीएफ चॅप्टर 2’ हा चित्रपट १६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट संपला, तेथूनच पुढे केजीएफ चॅप्टर 2 ची कथा सुरु होत आहे. संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार या सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.