एका पोस्टसाठी ‘देसी गर्ल’ला इन्स्टाग्राम देते एवढे मानधन


आता केवळ बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राचा ओळख राहिलेली नसून आता ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. तिला जगभरात ओळख ‘क्वांटिको’ मालिकेमुळे मिळाली. त्यामुळे तिला आपल्या प्रोजक्टमध्ये घेण्यासाठी सारेच दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असतात. ग्लोबल स्टार असलेल्या प्रियंकाचे मानधनदेखील आता चांगलेच वधारले आहे. ती केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठीदेखील तेवढे तगडे मानधन घेत असल्याचे समोर आले आहे.


एक यादी इन्स्टाग्रामकडून जाहीर करण्यात आली आहे. एका पोस्टसाठी कोणते सेलिब्रिटी नेमके किती मानधन घेतात हे या यादीमध्ये जाहीर करण्यात आले आहे. यात टॉप १०० लोकांमध्ये प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली या दोघांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. या यादीमध्ये प्रियंका २८ व्या स्थानावर असून ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल २.१६ कोटी रुपये मानधन घेते. इन्स्टावर तिचे ५४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.