पोलिसांना दिलेल्या जवाबात दासगुप्ता म्हणतात, अर्णब गोस्वामीने मला १२ हजार डॉलर्स आणि ४० लाख रुपये दिले


मुंबई – मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जवाबात बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी दावा केला आहे की, १२ हजार डॉलर त्यांना रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीकडून मिळाले होते. त्याचबरोबर दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांमध्ये त्यांना एकूण ४० लाख रुपये मिळाले, त्यांना ज्यासाठी रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने रेटींगमध्ये फेरफार करायची होती. त्या पुरवणी आरोपपत्रातून टीआरपीमध्ये फेरफार करण्याची ही माहिती मिळाली आहे, टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून जे दाखल करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांकडून ११ जानेवारी रोजी ३ हजार ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचा देखील समावेश होता. याचबरोबर दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप चॅटचा देखील समावेश आहे. तसेच बार्कचे माजी कर्मचारी आणि केबल ऑपरेटरसह ५९ जणांच्या वक्तव्यांचा समावेश आहे.

अनेक न्यूज चॅनल, रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ आणि आजतकसाठी बार्कचे वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे कथित टीरआरपी फेरफार आणि रेटींगच्या फिक्सिंग बाबत ऑडिट रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेले आहे. पुरवणी आरोपपत्र पार्थो दासगुप्ता, रोमील रामगढिया, विकास खनचंदानी यांच्या विरोधात दाखल करण्यात आले होते. सर्वात अगोदर १२ लोकांविरोधात नोव्हेंबरमध्ये आरोपपत्र दाखल कऱण्यात आले होते. दुसऱ्या आरोपपत्रानुसार दासगुप्ताचे म्हणणे क्राईम इंटेलिजन्स युनिटने ९ नोव्हेंबर रोजी रेकॉर्ड केले होते.

दासगुप्ताने सांगितले आहे की, अर्नब गोस्वामीला मी २००४ पासून ओळखतो. टाईम्स नाऊमध्ये आम्ही सोबत काम करत होतो. बार्कचा सीईओ म्हणून मी २०१३ मध्ये काम सुरू केले होते आणि अर्णब गोस्वामीने २०१७ मध्ये रिपब्लिक चॅनल सुरू केले होते. रिपब्लिक चॅनल सुरू करण्याअगोदर माझ्याशी त्याने अनेकदा योजनेबाबत चर्चा केली होती व रेटींगसाठी मदत करण्याचे देखील म्हटले होते. हे गोस्वमीला माहिती होते की, मला माहिती आहे टीआरपी प्रणाली कशाप्रकारे काम करते?

बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात टीआरपी वाढविण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता. तसचे, दासगुप्ता पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हणतात, क्रमांक एकची रेटींग रिपब्लिक टीव्हीला मिळावी, यासाठी मी आपल्या टीमसोबत काम करायचो व टीआरपीमध्ये फेरफार करायचो. जवळपास २०१७ पासून २०१९ पर्यंत हे सुरू होते. अर्णब गोस्वामीने २०१७ मध्ये मला माझ्या कुटंबियांसोबतच्या फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी जवळपास ६ हजार डॉलर कॅश दिले. यानंतर २०१९ मध्ये देखील त्यांनी मला तेवढीच रक्कम दिली. २०१७ मध्ये देखील गोस्वामीने माझी भेट घेतली आणि मला २० लाख रुपये कॅश दिले. २०१८ व २०१९ मध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळी १० लाख रुपये दिले.