राम गोपाल वर्मांनी मानले दाऊद इब्राहिमचे आभार


कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चर्चेत असतात. त्यांनी अलिकडेच महिलांविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा तसेच बेताल वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचे राम गोपाल वर्मा यांनी आभार मानले आहेत. त्यांनी हे वक्तव्य ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला राम गोपाल वर्मा यांचा ‘डी कंपनी’ हा चित्रपट येत आहे. त्यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली होती. त्यांनी या मुलाखतीत दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत. २०२१ मध्ये करोना विषाणू सारखा पसरणार डी कंपनी हा चित्रपट आहे आणि याच्यावर कोणतेही व्हॅक्सीन नसेल. तसेच मी गँगस्टरसारख्या चित्रपटासाठी दाऊद इब्राहिमचे आभार मानतो, असे राम गोपाल वर्मा म्हटले.

त्यांच्यावर त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीकास्त्र डागले आहे. ‘डी कंपनी’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये सध्या राम गोपाल वर्मा यांना बॅन करण्यात आले आहे. चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि अन्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी जवळपास १.५ कोटी रुपये थकवल्याचे म्हटले जात असल्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयजने (एफडब्लूआइसीई) एका बैठकीत फेडरेशनच्या ३२ संघटनांपैकी कोणतीही संघटना राम गोपाल वर्मा यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राम गोपाल वर्मा बॉलिवूडबाहेर चित्रपटांची निर्मिती करत असल्याचे म्हटले जाते.