राम शिंदेच्या चौंडीत रोहित पवार यांच्या गटाचा विजय


अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता भाजपचे नेते राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. रोहित पवार गटाचा राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला आहे. रोहित पवार यांच्या गटाने चौंडी ग्रामपंचायतीतील 9 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला 2 जागा राखण्यात यश मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी राम शिंदे यांना मोठा धक्का देत रोहित पवार यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांनी कायम लक्ष घातल्यामुळेच राम शिंदे यांच्या गावातही रोहित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे.