ओटीटीवर प्रदर्शित होणार कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ ?


कार्तिक आर्यनचे चाहते त्याच्या आगामी ‘धमाका’ची आतुरतेने वाट पाहात आहेत. पण त्याचदरम्यान आता एक मोठी बातमी चित्रपटासंदर्भात येत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याबरोबरच निर्मात्यांना हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपटाची घोषणा 22 नोव्हेंबरला करण्यात आली होती आणि शूटिंग डिसेंबरमध्ये 10 दिवसात पूर्ण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी हे लवकरात लवकर चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत.

हा चित्रपट यापूर्वी दिग्दर्शक राहुल ढोलकिया दिग्दर्शित करणार असल्याची बातमी मिळाली होती. जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यन नवीन वर्षाचे स्वागत त्यांनी गोव्यात केले. गोव्याचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यामुळे आता जान्हवी आणि कार्तिकच्या अफेयर्सच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे. पण अद्यापपर्यंत जान्हवी आणि कार्तिकने त्यांच्या नात्या संदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. गोव्यातील एका फोटोमध्ये जान्हवी आणि कार्तिकने एक सारख्याच रंगाचे ड्रेस घातले होते, त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला देखील आहे या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

कार्तिक अखेरचा सारा अली खान सोबत लव आज कालमध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. सध्या कार्तिकजवळ बरेच चित्रपट आहेत. भूल भूलैया 2 मध्ये कियारा अडवाणी सोबत तर दोस्ताना 2 मध्ये जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे.