DM पॉवर, भाजपला धक्का देत परळीत तब्बल ‘एवढ्या’ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय


बीड : शुक्रवारी बीड जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींपैकी 111 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत 1926 उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. नुकताच या निवडणुकांचा निकाल जाहीर होत असून राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री तसेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील परळीतून मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. तालुक्यातील एकूण 7 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले होते. पंकजा मुंडे आणि भाजपच्या गटाला त्यापैकी 6 ठिकाणी धक्का देत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.

दरम्यान धनंजय मुंडे हे मुंबईतील महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर अडचणीत सापडले आहेत. अशावेळी मुंडे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीत नेमके काय होणार, याची राज्यभर चर्चा होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत परळीतील जनतेने धनंजय मुंडे यांच्या बाजूनेच कौल दिला आहे.