धुम्रपान करणाऱ्या आणि शाहाकारी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी


नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत संपूर्ण भारतात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणानुसार धुम्रपान करणाऱ्या आणि शाहाकारी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती समोर आली आहे. ४० ठिकाणी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या रक्तगट ‘ओ’ किंवा ‘ए’ आणि जे खासगी वाहन, शाकाहारी पदार्थांचे सेवन करतात त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी असू शकतो.

तर ‘बी’ आणि ‘एबी’ ज्यांचा रक्तगट आहे त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असू शकतो, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडिज आहेत किंवा नाहीत याचा अभ्यास करण्यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चने आपल्या प्रयोगशाळेतील आणि संस्थेमध्ये काम करणाऱ्या १० हजार ४२७ वयस्कर व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नमूने घेतले. यात ज्या व्यक्तींना स्वइच्छेने सहभागी व्हायचे आहे, अशाच व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला. १० हजार ४२७ व्यक्तींचे नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ०५८ म्हणजेच १०.१४ टक्के लोकांमध्ये SARS-CoV-2 चे अँटिबॉडिज असल्याचे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च आणि इंस्टीट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (IGIB), दिल्ली यांच्या अभ्यासातून समोर आले आहे.

गोळा करण्यात आलेल्या नमून्यांपैकी ३४६ सिरो पॉझिटिव्ह व्यक्तींच्या तीन महिन्यांनंतर केलेल्या तपासणीनंतर त्यांच्यात SARS-CoV-2 च्या प्रती असलेल्या अँटिबॉटिजचे प्रमाण स्थिर पासून अधिक एवढे होते. पण विषाणूचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक असलेली प्लाझ्मा अॅक्टिव्हिटीत मात्र घसरण दिसून आल्याची माहिती आयजीआयबीमधील ज्येष्ठ वैज्ञानिक आणि या अभ्यासाचे सह-लेखक शंतनू सेनगुप्ता यांनी सांगितले. सहा महिन्यांनंतर ३५ व्यक्तींचे पुन्हा नमूने तपासणीसाठी घेण्यात आले. पण अँटिबॉडीचा स्तर हा तीन महिन्यांच्या तुलनेत कमी झालेला दिसला. तर विषाणूचा परिणाम कमी करणाऱ्या अँटिबॉडीचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून आल्याचेही ते म्हणाले.

सिरो पॉझिटिव्ह धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये असण्याची शक्यता कमी असल्याचा आमचा निष्कर्ष आहे. श्वसनासंबंधी आजार कोरोनामुळे निर्माण होत असला तरी धुम्रपानामुळे यापासून बचाव होऊ शकतो, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. फ्रान्समधील दोन, इटली, न्ययॉर्क, आणि चीनमधील सर्वेक्षणाच्या अहवालाचा हवाला या अभ्यासात देण्यात आला आहे. त्यामध्येही धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये संक्रमणाचा दर कमी असल्याचे दिसून आले होते.