इस्रायलमधील १३ जणांना कोरोना लस दिल्यानंतर चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका


जेरुसलेम – कोरोनाची लस घेतल्यानंतर इस्रायलमधील १३ जणांना फेशीयल पॅरलिसिस म्हणजेच चेहऱ्याच्या भागात अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त विनोने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अशाप्रकारे लसीचे साइड इफेक्ट दिसणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती इस्रायलमधील आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. कोरोना लसीच्या या साईड इफेक्टमधून अनेकजण बाहेर आले असले, तरी त्यांना हा त्रास जाणवल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. व्हायनेटशी बोलताना एका व्यक्तीने मला जवळजवळ २८ तास फेशियल पॅरलिसिसचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले. पण त्यानंतर यामधून आपण बाहेर आल्याचेही या व्यक्तीने स्पष्ट केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने पॅरालिसिस बरा झाल्यावर नियोजित वेळेनुसार दुसरा डोस देण्याचा आग्रह धरला असला, तरी या लोकांना आता शॉटचा दुसरा डोस देण्यासंदर्भातील भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चेहऱ्यातील स्नायूंच्या हालचालीमध्ये मला सुरुवातीला त्रास जाणवला. नंतर सारे काही लगेच ठीक झाले असे झाले नसले तरी आता प्रकृती आधीपेक्षा नक्कीच उत्तम आहे, असे कोरोना लसीचा साइफेक्ट दिसून आलेल्या एकाने व्हायनेटशी बोलताना सांगितले. २० डिसेंबर २०२० पासून इस्रायलमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ७२ टक्क्यांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

तर दूसरीकडे कोरोना लसीकरणानंतर नॉर्वेमध्येही काही वेळातच २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली असतानाच कोरोना लसीच्या प्रतिकूल परिणामांचे वृत्त इस्रायलमधूनही समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. २३ ज्येष्ठ नागरिकांचा फायझर-बायोएनटेक लस घेतल्यानंतर मृत्यू झाला. नॉर्वेत अनेक वृद्ध नागरिक या लसीमुळे आजारीही पडले आहेत. या मृत्यूचा तपास नॉर्वे डॉक्टरांनी सुरू केला आहे. ज्या व्यक्ती ८० वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्यामध्ये लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मृत्यू झालेल्या २३ लोकांपैकी १३ जणांमध्ये डायरिया आणि ताप यांची लक्षण दिसून आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. नॉर्वेत २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आणि चिंता व्यक्त होऊ लागल्यानंतर फायझरने युरोपमध्ये केला जाणारा लसीचा पुरवठा तात्पुरत्या काळासाठी कमी केला आहे. २३ जणांच्या मृत्यूनंतर ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यासंदर्भात विशेष इशारा नॉर्वेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. नॉर्वेत डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत ३० हजार लोकांना फायझर वा मॉर्डन या दोन्ही एका लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.