१०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्स गुगलने प्ले स्टोरवरून हटवले


नवी दिल्लीः आपल्या प्ले स्टोरवरून असे अनेक अॅप्स गूगल इंडियाने हटवले आहेत. जे युजर्सच्या सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करीत होते. सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करून ऑनलाइन लोन सर्विस हे अॅप्स देत होते. आपल्या एका ब्लॉगमधून ही माहिती गुगलने दिली आहे. गुगलने ही कारवाई सरकार आणि युजर्सकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर केली आहे. जवळपास १०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्सवर गुगलने धडक कारवाई केली आहे.

गुगलचा हा निर्णय म्हणजे अशा वेळी आला आहे. ज्यावेळी अनेक युजर्स गेल्या काही दिवसांपासून शॉर्ट टर्म लोन देणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रार करीत होते. आपल्या लोनसाठी अनेक कंपन्या युजर्संचा छळ करीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काहींनी तर लोन फेडू न शकल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला होता. तर काही कंपन्या पर्सनल लोन देण्याच्या नावाखाली कॉन्टॅक्ट डिटेल्स अॅक्सेस करीत होती. काहींनी तर वसूली एजन्टकडून धमकावले जात असल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, त्या सर्व अॅप्स नंबरला गुगलने शेअर केले नाही. नुकतेच ज्यांना प्ले स्टोरवरून हटवले आहे. दरम्यान, फिनटेक एक्सपर्ट श्रीकांत एल यांनी सांगितले की, गेल्या १० दिवसांत गुगलने कमीत कमी ११८ डिजिटल लोन अॅप्सना हटवले आहे. पर्सनल लोन देणाऱ्या असंख्या कंपन्यांना गुगलने विचारणा केली आहे की, ते कशा पद्धतीने लोकल कायदा आणि रेग्युलेशनला फॉलो करीत आहे.