राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 3% वाढ


मुंबई – राज्य सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या कर्मचा-यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे. राज्य सरकारने ही मोठी घोषणा नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या निमित्ताने केली आहे. या गोड बातमीने वर्षाची सुरुवात झाल्याने यंदाचे वर्ष सरकारी कर्मचा-यांसाठी आनंद घेऊन आल्याचे या निमित्ताने दिसत आहे.

महाभाई भत्त्यात राज्य सरकारने केलेल्या 3% वाढीमुळे महागाई भत्ता 9 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, वाढीव 3 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या कालावधीसाठी मिळणार आहे. जानेवारी 2021च्या पगारात जानेवारी 2019 ते जून 2019 या सहा महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जोडली जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार घसघसीत मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

याबाबतची घोषणा डिसेंबर 2020 महिन्यात करण्यात आली होती. ज्यानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार त्यांच्या पगारात आणि डीएमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ही घोषणा आता सत्यात अवतरली असून लवकरच याचा लाभ सर्व सरकारी कर्मचा-यांना मिळणार आहे.

दरम्यान दिल्ली सरकारने अकुशल श्रमिकांसाठी 15,492 रुपये, अर्धकुशल साठी 17,069 रुपये आणि कुशल कर्मचा-यांसाठी 18,797 रुपये असा पगार निर्धारित करण्यात आला आहे. तसेच लिपिक आणि पर्यवेक्षी कर्मचा-यांच्या पगारात देखील वाढ करण्यात आली आहे. यात गैर-मॅट्रिक्युलेशन ला महिना पगार 17,069 रुपये मिळणार आहे. तर मॅट्रिक पास पण गैर स्नातक यांना मासिक वेतन 18,797 रुपये मिळेल. तर स्नातक आणि त्यावर पदावर असलेल्यांना मासिक वेतन 20,430 रुपये मिळेल.