अखेर पोपटालालचे लग्न झालेच


गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका राज्य करत आहे. ही मालिका मालिकांच्या विषयांमधील तोच तो एकसारखेपणा टाळत प्रेक्षकांचे अविरत निखळ मनोरंजन करत आहे. गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, कोमल, बबिता, अंजली ही सर्वच पात्र खूप प्रसिद्ध आहेत. पण, त्यातील पोपटलाल हे पात्र खूपच रंजक असून लग्नाचे वय उलटूनही पोपटलाल अद्याप बोहल्यावर न चढल्याने कावराबावरा झाल्याचे आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालो होते. पण त्याच पोपटलालचे अखेर घोडे गंगेत न्हाले आहे. कारण पोपटलाल आता विवाहबद्ध झाला आहे.

गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या पोपटलाच्या घराच्या बाल्कनीत काही दिवसांपूर्वी एक नवविवाहित तरुणी उभी असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सोसायटीतील सदस्यांनादेखील या मुलीला पाहून धक्का बसला आहे. पण खरंच पोपटलालने लग्न केले आहे, यावर त्यांचा आता विश्वास बसला आहे. त्याचबरोबर आता संपूर्ण गोकुळधाम सोसायटी या नवविवाहितेचे स्वागत करण्यासाठी नवीन प्लॅन करत आहे.

दरम्यान, केवळ गोकुळधाम सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे तर ही मालिका पाहणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना देखील पोपटलालचे लग्न कधी होणार हा प्रश्न पडला होता. पण आता पोपटलालचे दोनाचे चार हात झाले असून ही मालिका आता या पुढे कोणत्या रंजक वळणावर जाणार हे आगामी भागातून आपल्यास पाहायला मिळणार आहे.