डोनाल्ड ट्रम्प यांचा तडकाफडकी राजीनामा!


वॉशिंग्टन – अमेरिकेत नवीन सरकार बनविण्याची तयारी जोरात सुरु झालेली असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आज महाभियोग प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता होती. अशातच ट्रम्प यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अमेरिकेसह जगभरात काही काळ खळबळ उडाली आहे

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर आलेल्या एका अपडेटने जगभरात खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा कार्यकाळ संपल्याचे वेबसाईटवर दाखविण्यात आले. त्याचबरोबर त्यात राजीनामा दिल्याचे म्हटले गेले. विशेष म्हणजे ट्रम्प त्यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव जेव्हा एक बकवास असल्याचे सांगत असताना दुसरीकडे ही हालचाल केली गेल्यानंतर हा खोडसाळपणा वेबसाईटचे काम पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचा असल्याचे उघड झाले.

ही माहिती वेबसाईटवर राष्ट्राध्यक्ष आणि उप राष्ट्राध्यक्षांच्या प्रोफाईलवर अपडेट करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 11 जानेवारीला संपला असून त्याबाबतची माहिती नवीन सरकार आल्यावर अपडेट केली जाईल, असे म्हटले होते. यावरून जगभरात चर्चा झडू लागल्यानंतर याचा खुलासा अमेरिकी मिडीयाने केला. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याने हे कृत्य केले असून सध्याच्या सरकारवर तो नाराज होता. अद्याप ट्रम्प आणि पेन्स यांनी राजीनामा दिलेला नाही. दोघांचाही कार्यकाळ 20 जानेवारीला संपणार असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही.

यावर आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया यायला लागल्या. हा एक सत्ता हस्तांतराचा हिस्सा असू शकतो. या कर्मचाऱ्याने तो चुकून वेबसाईटवर पोस्ट केला. 20 जानेवारीला अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शपथ घेणार आहेत. यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही हस्तांतरण योग्य पद्धतीने पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, माईक पेन्स यांनी संविधानाच्या 25 व्या संशोधनाचा वापर करण्यास नकार दिल्याने ट्रम्प याच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया रद्द झाली असून ट्रम्प त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार आहेत.