गुगल सर्चमध्ये दिसत आहे काही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाइल


नवी दिल्लीः Google आणि WhatsApp ची गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जोरदार चर्चा सुरू झाली होती. गुगल सर्च रिझल्टमध्ये ज्यावेळी काही पब्लिक ग्रुप दिसायला सुरू झाले होते. गुगल सर्चमध्ये या व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटकडून मेंबर इन्फोला पाहिले गेले होते. पण काही वेळातच ही समस्या दूर करण्यात आली होती. तसेच ग्रुप सुद्धा लपवण्यात आले होते. पण काही व्हॉट्सअॅप ग्रुप आणि प्रोफाइल आता पुन्हा एकदा गुगल सर्चमध्ये दिसत असल्याची माहिती सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजसहरिया यांनी Gadgets 360 सोबत चर्चा करताना दिली.युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाइल पिक्चर सुद्धा यावेळी गुगल सर्चमध्ये दिसत आहे. म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा ही स्थिती चिंताजनक असून व्हॉट्सअॅप ग्रुपची जर कोणाकडे यूआरएल असेल तर गुगलवर याला सर्च करून ग्रुप जॉइन करू शकतात.

रिपोर्टमध्ये हेही सांगितले गेले आहे की, लिंकसोबत यूजर्स ग्रुप जॉइन करू शकतात. तसेच ग्रुप मेंबर्सचा फोन नंबर पाहू शकतात. त्याचबरोबर गुगल सर्च करून ग्रुप मेंबरच्या पोस्ट सुद्धा पाहिल्या जाऊ शकतात. अखेर व्हॉट्सअॅपने कधीपासून ग्रुप चॅट इनव्हाइटला गुगलवर इंडेक्स करणे सुरू केले, ही माहिती सध्या उघड झालेली नाही. पण जवळपास १५०० ग्रुप इनव्हाइट लिंक गुगल सर्च रिझल्टमध्ये आधीच उपलब्ध आहेत. गुगलकडून इंडेक्स करण्यात आलेल्या काही ग्रुप युजर्संना पॉर्न कॉन्टॅक्टवर रिडायरेक्ट करीत असून काही ग्रुप स्पेसिफिक युजर इंट्रेस्टचे आहेत.

याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टेंट मेसेंजर अॅप chat.whatsapp.com सबडोमेन साठी robots.txt फाइलचा वापर करीत नाही. कंपन्या सर्च क्रॉलर्सला कॉन्टेन्ट इंडेक्स करण्यापासून रोखण्यासाठी robots.txt चा वापर करते. युजर प्रोफाइल पाहिल्यास गुगलने युजर्सचा प्रायव्हेट अकाउंट दाखवणे सुरू केले आहे. यात युजर्सची प्रोफाइल इमेज, त्याच्या नावाचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपचच्या डोमेनवर कंट्री कोड टाकून युजर प्रोफाइल पाहू शकतात. दरम्यान गुगलवर जवळपास ५००० प्रोफाइल आता सार्वजनिक आहे. राजसाहरिया यांच्या माहितीनुसार, robots.txt फाइलचा वापर व्हॉट्सअॅप या ठिकाणी करीत नाही. व्हॉट्सअॅप आणि गुगलने सध्या यासंबंधी कोणतीही माहिती दिली नाही.