ब्रॉडबँड इंटरनेट आरोग्याला अपायकारकच – झोपेवर होतो परिणाम!


वेगवान इंटरनेटसाठी ब्रॉडबँड आणि वायफाय यांसारख्या सुविधा घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी शास्त्रज्ञांनी दिली आहे. वेगवान इंटरनेट वापरल्यामुळे तुम्ही किती आणि कशी झोप घ्याल, यावर प्रभाव पडू शकतो असे शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे.

डिजिटल सब्सक्रायबर लाईन (डीएसएल) या सुविधेचा उपयोग करणारे लोक डीएसएल इंटरनेट न वापरणाऱ्यांच्या तुलनेत 25 मिनिटे कमी झोपतात, असे या संशोधनात आढळले आहे. इटालीच्या बोकोनी यूनिव्हर्सिटी आणि अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. डीएसएल या तंत्रज्ञानातून सामान्य तांब्याच्या टेलिफोन तारांऐवजी जास्त बँडविथ असलेले इंटरनेट पोचविले जाते.

‘जर्नल ऑफ इकोनॉमिक बिहेव्हियर अँड ऑर्गनायजेशन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. वेगवान इंटरनेटच्या वापरामुळे ज्यांना सकाळी कामासाठी किंवा कुटुंबासाठी वेळ काढता येत नाही, त्यांचे समाधान कमी होते, असे बोकोनी यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक फ्रांसेस्को बिल्लारी यांनी सांगितले. असे लोक सात किंवा नऊ तासांची झोप घेऊ शकत नाहीत आणि त्यांना झोपेतून समाधानही मिळत नाही, असे बिल्लारी यांनी सांगितले. चांगल्या आरोग्यासाठी सात ते नऊ तास झोप घेणे आवश्यक असल्याचा सल्ला शास्त्रज्ञ देतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment