सोनिया गांधी आणि मायावती यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा – हरिश रावत


नवी दिल्ली – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना भारतरत्नने सन्मानित करायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.


रावत म्हणाले, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी असून त्यांच्या राजकारणाशी तुम्ही सहमत असाला किंवा नसाल. पण भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना सोनिया गांधी यांनी एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. त्यांना आज भारतीय महिलांचे गौरवशाली स्वरुप मानले जाते.

त्याचबरोबर अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात मायावती यांनी एक अद्भुत विश्वास जागृत केला असल्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तिमत्वांचा या वर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा. ट्विटरवरुन आपले मत व्यक्त करताना हरिश रावत यांनी ही पोस्ट भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केली आहे.