जाणून घ्या किती धोकादायक आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन, ही आहेत लक्षणे


कोरोनाची दहशत अद्याप कमी झालेली नाही. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे तर लोकांच्या तणावामध्ये अजून वाढ झाली. ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन डेनमार्क, नेदरलॅंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, जपाननंतर आता भारतातही दाखल झाला आहे. जिथे लोकांना कोरोना प्रतिबंधक लस आल्याने काहीसा धीर मिळाला होता, पण आता त्यांचे टेंशन कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे वाढले आहे. नव्या स्ट्रेनचा स्त्रोत शोधण्याचा जगभरातील वैज्ञानिक आणि चिकित्सक सतत प्रयत्न करत आहेत. याबाबत अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.

पण जेव्हा म्यूटेंट व्हेरिएंट म्हणजे नवीन स्ट्रेनच्या लक्षणांचा विषय येतो, तेव्हा सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनने लोकांना यापासून बचावासाठी लगेच डॉक्टरांना संपर्क करण्याचा आणि याकडे अजिबात दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये नव्या प्रकारचा कोरोना एक गंभीर धोका निर्माण करू शकतो.

कोरोना व्हायरसची माहिती जेव्हा पहिल्यांदा समोर आली होती, तेव्हा याच्या वेगवेगळी लक्षणे समोर आली होती. वैज्ञानिकांनाही या व्हायरसबाबत रोज नवीन गोष्टी समजतात. तज्ज्ञांनी कोरोनाची काही मुख्य लक्षणे सांगितली आहेत. ज्यात ताप, कोरडा खोकला, घशात खवखव, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा, पोटासंबंधी संक्रमण, चव किंवा गंध न समजणे इत्यादींचा लक्षणांचा समावेश होता.

VUI 202012/01 असे नाव कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला देण्यात आले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामध्ये स्पाइक प्रोटीन असल्याची बाब समोर आली आहे. तज्ज्ञांनुसार, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये स्पाइक एक आनुवांशिक परिवर्तन आहे. जो लोकांच्या शरीरात सहजपणे आणि वेगाने पसरत आहे. स्पाइक प्रोटीनच्या मदतीने कोरोना मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि सेल्स आपल्या ताब्यात घेतो. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये १७ वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असण्याची बाब समोर आली आहे. या म्युटेशनमध्ये स्पाइक प्रोटीनही आहे जे कोरोना व्हायरस फॅमिलीला त्याचं नाव देतो.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणेही पहिल्या कोरोना सारखीच आहेत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनने नवीन कोरोनाच्या स्ट्रेनची ५ गंभीर लक्षणे सांगितली आहेत. यावर प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. ही लक्षणे जर तुम्हालाही जाणवली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यात श्वास घेण्यास त्रास होणे, भ्रम झाल्यासारखे वाटणे, सतत छातीत दुखणे, थकवा जाणवणे, चेहरा आणि ओठ निळे पडणे या लक्षणांचा समावेश आहे.

नुकताच लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत एक संशोधन करण्यात आले. ज्यात असे सांगण्यात आले की, कोरोनाचा नवा स्ट्रेन लंडनमधील मृतांचा आकडा वाढवू शकतो. तज्ज्ञांना अशीही भीती आहे की, २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये पसरणाऱ्या म्युटेशनने रूग्णांची संख्या अधिक वाढेल. तसेच तज्ज्ञ म्हणाले की, या नव्या स्ट्रेनचा धोका लहान मुलांना सुद्धा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही