नव्या वर्षात Facebook मध्ये येणार हे Security फीचर्स


नवी दिल्ली : आता सुरक्षेबाबत जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक अधिक गंभीर झाले आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर नव्या वर्षात फेसबुक अनेक अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स जोडणार आहे. यासंदर्भात फेसबुककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोशल नेटवर्क मोबाईल ऍपमध्ये युजर्सला लॉग इन करण्यापूर्वी आपली ओळख व्हेरिफाय करण्यासाठी फिजिकल सिक्युरिटीचा ऑप्शन देईल. डेस्कटॉपमध्ये सध्या प्रत्येक लॉग इन आधी कनेक्ट करण्यासाठी हार्डवेअर सिक्युरिटीची गरज असते.

यासंदर्भात एक्सियोस साईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुकने सांगितले की, रिटेलरकडून एक हार्डवेअर युजर्स खरेदी करु शकतात आणि ते फेसबुकसोबत रजिस्टर्ड करू शकतात. नव्या सिक्युरिटी सर्व्हिसेस जुलैमध्ये रोलआउट केल्या जातील. आपल्या फेसबुक अकाउंटमध्ये हे फीचर युजर्सला ऍड करण्यासाठी टू स्टेप ऑथेंटिकेशनची आवश्यकता आहे. टेक्स मेसेजद्वारे किंवा थर्ड पार्टी ऑथेंटिकेशनने जे युजर पूर्ण करू शकतील. त्यानंतर एक हार्डवेअर डिवाईस खरेदी करावे लागेल, ज्यात यूनिवर्सल 2 फॅक्टर सपोर्ट असेल, फेसबुक व्हेरिफिकेशन रुपात ज्याला जोडावे लागेल. ही प्रोसेस एकदा पूर्ण झाल्यानंतर युजर आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी या फिजिकल सिक्युरिटीला प्लग इन करावे लागेल. सध्या अमेरिकेत हे उपलब्ध असून नेते, सरकारी एजेन्सी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी फेसबुक अतिरिक्त सुरक्षा देते. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि संभाव्य हॅकिंग धोक्यासाठी रियल मॉनिटरिंगही देते.