राम शिंदेंच्या आरोपांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर; शिंदेंना गटातटाच्या राजकारणात रस


अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर तीस लाखांच्या बक्षीसावरुन भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी जोरदार टीका केली होती. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गटतट गावात नसावेत, असा माझा प्रामाणिक उद्देश आहे. पण त्यांचा उद्देश गटतट असावेत असा असल्याचे प्रत्युत्तर रोहित पवारांनी शिंदे यांना दिले आहे.

त्यांचा गावात गटतट असावेत असावे असा प्रामाणिक हेतू असावा, पण माझा हेतू गटतट नसावेत असा आहे. गावच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र येत असतील, तर त्याला हरकत काय आहे, असा सवाल त्यांनी राम शिंदे यांना केला. माझा बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी गटतट विसरुन विकासाचे राजकारण करावे. त्यांना विकासचे काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु, असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.

राम शिंदे एकतर काय बोलतात त्यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे, असा टोला लगावत लोकांच्या हिताच्या दृष्टीनेच मी या पुढे काम करत राहील, असे रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले. पण असे बक्षीस जाहीर करणे म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली होता. राज्य निवडणूक आयोगाने रोहित यांच्या प्रलोभनाची दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी राम शिंदे यांनी केली होती.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे जाहीर केले आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने रोहित पवारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राम शिंदेंनी केली आहे. रोहित पवार ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत. पण असेच सुरु राहील तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार-खासदार होतील, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.