हैदराबादमधील एक कंपनीने आठ बँकांना घातला ४३०० कोटींचा गंडा


नवी दिल्ली – आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची हैदराबादमधील एका कंपनीने फसवणूक केली आहे. याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

आयव्हीआरएसएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण, ऑपरेशन्स आणि देखभाल आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे. आपल्या तक्रारीत स्टेट बँक ऑफ इंडियाने आरोप केला आहे की, आरोपींनी अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली आहे.

यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या सर्व बँकांना ४८३७ कोटींची फसवणूक झाली आहे. सीबीआयचे प्रवक्ते आर जी कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपांनुसार कर्जदार कंपनीच्या संचालकांनी असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बँकांकडून क्रे़डिट लिमिटचा लाभ घेतला आणि कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली.

तक्रारीत दाखल माहितीनुसार, संबंधित लोकांना कंपनीने लेटर ऑफ क्रेडिट्सच्या (LCs) माध्यमातून पैसे दिले. त्यांनी यावेळी खरेदी व्यवहारांची नोंद न करता कंपनीच्या खात्यात हा निधी जमा केला आणि बँकेच्या निधीचा गैरवापर केला. बुधवारी यासंबंधी सीबीआयकडून आरोपींची कार्यालये आणि घरांवर टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत.