अखेर त्या महिलेची अमिताभ बच्चन यांना मागावी लागली माफी


अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी चहावर आधारित एक कविता ट्विटरवर शेअर केली होती. सोशल मीडियावर या कवितेवरुन बरीच चर्चा रंगली होती. त्यातच एका महिलेने बिग बींनी ही कविता चोरल्याचा आरोप केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जाहीरपणे या महिलेची माफी मागत या कवितेचे मूळ कवी माहित नसल्यामुळे ही चूक झाल्याचे स्पष्ट केले आहे.

बिग बींनी अलिकडेच ट्विटरवर चहावर आधारित एक कविता शेअर केली होती. पण आपण ही कविता लिहिली असून बिग बींनी ही कविता शेअर करत साधे क्रेडिटदेखील दिले नसल्याचे टीशा अग्रवाल यांनी म्हटले होते. बिग बींच्या कमेंट सेक्शनमध्ये याविषयी टीशा यांनी मत व्यक्त केले होते. सोबतच याविषयी स्वत:च्या फेसबुक पोस्टमध्येही लिहिले होते. त्यानंतर एक नवीन ट्विट करुन बिग बींनी टीशा यांची माफी मागितली आहे.


टीशा अग्रवाल यांना या ट्विटचे श्रेय दिले पाहिजे. ही मूळ कविता कोणाची आहे हे मला माहिती नव्हते. मला कोणी तरी ही पाठवली होती. मला ही कविता छान वाटल्यामुळे ती पोस्ट मी केली असल्याचे म्हणत बिग बींनी जाहीरपणे टीशाची माफी मागितली आहे.