पुण्यात रात्रीच्या वेळी आता संचारबंदी नव्हे तर जमावबंदी


पुणे : महापालिका क्षेत्रात राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला असून रात्रीच्या वेळी आता पुण्यात संचारबंदी लागू राहणार नसून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांना रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवा यांना यातून सवलत देण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढला आहे. त्यानुसार ५ जानेवारीपर्यंत दररोज रात्री ११ ते दुसरे दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यात ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येण्यास व फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याअगोदर २२ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी मनाई करण्यात आली होती. त्यात आता बदल करुन लोकांना जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.