पुण्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांनी मंगळ-गुरुदरम्यान शोधले सहा नवे लघुग्रह


पुणे – पुण्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांनी खगोल विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या दोन विद्यार्थ्यांनी अंतराळात सहा लघुग्रहाचा शोध लावला आहे. त्यांना लघुग्रहांचा शोध घेत असताना असे दिसून आले की, २७ लघुग्रहांचाच हे सहा लघुग्रह भाग होते.

या दोन्ही विद्यार्थ्यांनी हा शोध कलाम सेंटर आणि आंतरराष्ट्रीय एस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लघुग्रह शोध मोहिमेदम्यान लावला. ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत एका जागतिक स्तरावरील कार्यक्रमाद्वारे या अभियानासाठी २२ जणांची निवड करण्यात आली होती.

मंगळ आणि गुरू या दोन्ही ग्रहांच्या कक्षांमधील स्थिती आणि पृथ्वीजवळील संभावित असलेल्या लघुग्रहाचे विश्लेषण करण्यासाठी जगभरातून निवडण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्राथमिक लघुग्रहांचा सहभागी झालेल्या स्पर्धकांनी २७ शोध घेतला. यात पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी सहा लघुग्रहांचा शोध लावला आहे. पुणे जिल्ह्यातील लोहगावमध्ये असलेल्या विखे पाटील शाळेचे या दोव्ही विद्यार्थिनी आहेत. या विद्यार्थ्यींनीची आर्या पुळाटे आणि श्रेया वाघमारे अशी नावे आहेत.

मंगळ आणि गुरू या दोन्ही ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान शोधण्यात आलेले हे लघुग्रह दिसून आले आहेत. लघुग्रहांना छोटे ग्रह म्हणून नोंदवण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे माजी सल्लागार आणि कलाम सेंटरचे संस्थापक श्रीजनपाल सिंह यांनी सांगितले की, या लघुग्रहांना ओळखण्यासाठी आणि त्यांचे आरेखन करण्यासाठी आम्ही लावलेला शोध महत्त्वपूर्ण आहे.