नवी दिल्ली – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत असणार आहे. युनायटेड किंग्डममध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी
कोरोना व्हायरसचा नवा प्रकार युकेमध्ये आढळल्यामुळे तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमाने युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना कोरोना चाचणी करणो आवश्यक असणार आहे. युकेहून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर RTPCR चाचणी करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.