गुगल ‘तारा’ देणार दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट सेवा

फोटो साभार अमर उजाला

शहरी भागात अतिवेगवान इंटरनेट सेवा देण्याबरोबरच देशाच्या अति दुर्गम, पहाडी भागात हाय स्पीड सेवा देण्याचे काम गुगलच्या ‘तारा’ प्रोजेक्ट मार्फत केले जाणार आहे. यात लाईट बीमच्या वापराने टेलीकास्ट कनेक्टीव्हिटी व हायस्पीड इंटरनेट साठी सुपर टेक्नोलोजीच वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान गुंतागुंतीचे आहे. अतिशय बारीक म्हणजे जवळजवळ अदृश्य बीमच्या सहाय्याने हवेत सुपर हाय स्पीड डेटा यात ट्रान्समीट केला जातो.

विशेष म्हणजे या साठी केबलची गरज नाही. मोठमोठ्या इमारती, किंवा कोणत्याही दुर्गम, अडचणीच्या भागात सर्वर ट्रान्समीटर व रीसिव्हरमध्ये रेडीओ वेब ऐवजी लाईट बीम पाठवले जातात. ग्राहक सध्या १ गिगा प्रतिसेकंद चा स्पीड मिळवू शकत असले तरी या तंत्रज्ञान वापराने ही क्षमता २० गिगा प्रती सेकंड इतकी वेगवान होऊ शकते. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी गुगल देशातील तीन बड्या कंपन्यांबरोबर सहकार्य संदर्भात चर्चा करत असल्याचे समजते.

हे नेटवर्क बिना केबल असल्याने टॉवरवरील ओझे किंवा भार कमी होणार आहे. या तारा योजनेची सुरवात भारतात आंध्र प्रदेशातून होणार आहे आणि आफ्रिकेतील केनिया मध्ये या प्रयोगाची सुरवात केली जाणार आहे.