या दिवशी होतात सर्वाधिक ब्रेक अप्स

नातेसंदर्भात एक धक्कादायक बाब नुकतीच एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. नाती का तुटतात म्हणजे ब्रेक अप का होतात याची कारणे अनेक असली तरी बहुटेक ब्रेक अप शुक्रवारी होतात असे या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. ‘इलीसीट एनकाउंटर’ या इंग्रजी वेबसाईटवर या संदर्भात माहिती दिली गेली आहे. विमेन हेल्थ ऑस्ट्रेलियाच्या रिपोर्ट नुसार यासाठी १ हजार लोकांचे सर्व्हेक्षण केले गेले.

यात असे दिसले की पार्टनर धोका देण्याची सर्वाधिक शक्यता शुक्रवारी आहे. या दिवशी पार्टनर साथीदाराबरोबर खोटे बोलण्याचे प्रमाण सर्वाधिक असून आपला साथीदार खोटे बोलतोय अशी थोडीशी जरी शंका दुसर्याला आली तरी त्याचे पर्यवसान ब्रेक अप मध्ये होते. याच दिवशी पार्टनर एकमेकांपासून सत्य लपवितात असेही दिसून आले असून शुक्रवारी ब्रेकअप होण्याचे प्रमाण ७५ टक्के इतके जास्त आहे.

या संदर्भात सर्वेक्षण केलेल्या संस्थेचा प्रवक्ता अधिक माहिती देताना म्हणाला, रिलेशनशिप मध्ये धोका देणे ही माणसाची पायाभूत प्रवृत्ती आहे. पण धोका देणारे पार्टनर काही विशेष बाबींमुळे ओळखता येऊ शकतात. सर्व्हेक्षणात असे दिसले की ज्याची प्रवृत्ती धोका देण्याची आहे ते आपल्या पार्टनरला आठवड्यातून दोन वेळा भेटणे पसंत करतात. त्यातही ६४ टक्के धोकेबाज पार्टनर आपल्या जोडीदाराला मंगळवारी भेटण्यास प्राधान्य देतात.