…यामुळे पुण्यातील खासगी शाळा 3 दिवस ठेवणार ऑनलाईन शिक्षण बंद


पुणे: केवळ पालकांनाच कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे असे नाही, तर कोरोनामुळे शाळांचीही आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. आता ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवणेही खासगी माध्यमाच्या इंग्रजी शाळांना अशक्य झाले असल्यामुळे यात आता राज्य शासनानेच हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असून याबाबीकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ स्कूलस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे चौदाशे शाळा तीन दिवस बंद ठेवल्या जाणार आहे.

अनेक पालकांचे रोजगार कोरोनामुळे गेल्याने पालकांकडे शुल्कासाठी शाळांनी तगादा लावू नये, असे परिपत्रक राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आल्यामुळे पालकांना शुल्क भरण्यास शाळांनी सवलत दिली. पण आर्थिक परिस्थिती चांगली असणारे पालकही शाळांचे शुल्क भरत नसल्याचा दावा फेडरेशन ऑफ स्कूलस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी राजेंद्र सिंह म्हणाले, पालकांनी स्कूलबस, जेवन ,जिमखाना आदी गोष्टींसाठी आकारले जाणार शुल्क वगळून टप्प्या-टप्प्याने शुल्क भरावे, असे आवाहन पालकांना शाळांतर्फे करण्यात आले. बऱ्याच शाळांनी कोरोनाकाळात ट्रस्टमधील रक्कम खर्च करून शिक्षकांचे पगार केले. केवळ 30 टक्के पालक शाळांकडे शुल्क जमा करणारे असून शुल्क सुमारे 50 टक्के जमा करण्यास नकार देणाऱ्या पालकांची संख्या आहे. तर शुल्क भरण्याबाबत अडचण असल्याचे 20 टक्के पालकांनी शाळांना कळवले आहे.

शाळांकडे जमा होणाऱ्या केवळ ३० टक्के शुल्कावर शिक्षकांचे पगार, शाळेच्या जागेचे भाडे, बँकेचे हप्प्ते आदी गोष्टीसाठी भागवणे आता शक्य होत नसल्यामुळे शाळांवर ऑनलाईन शिक्षणही बंद करण्याची वेळ आली आहे. शाळांची बाजूही शासनाने व पालकांनी समजून घ्यावी, यासाठी येत्या १५ ते १७ जानेवारी या कालावधीत शाळांचे सर्व शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याचेही राजेंद्र सिंह म्हणाले.

Loading RSS Feed