पालकांवर शाळेच्या फीसाठी दबाव आणणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई होणार – वर्षा गायकवाड


नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्यामुळे सध्या ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षण सुरु असूनही शाळा संस्थाचालकांकडून पालकांवर फी देण्यासंदर्भात दबाव आणला जात असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना याची माहिती देण्यात आली असून आहे. फी देण्यासंदर्भात अशा अनेक तक्रारी आल्यामुळे राज्य सरकार यासंदर्भात कठोर कारवाई करणार आहे. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांकडून फी संदर्भात कुठलीही जबरदस्ती करू नये तसेच त्यांना सवलत देण्यात यावे याकरिता राज्य सरकारने जीआर देखील काढला आहे.

सरकारने जीआर काढूनही फी संदर्भात पालकांवर संस्थाचालकांकडून दबाव आणला जात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहित शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पालकांकडून नाशिक येथील एका संस्थाचालक विरोधात ही तक्रार आली असून शिक्षण विभाग या संदर्भात कशी प्रकारे कारवाई करता येईल या संदर्भात पाहणी करत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी सांगितली आहे.