अजित पवारांच्या वक्तव्यावरुन निलेश राणेंनी साधला निशाणा


मुंबई – भाजपला विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मोठा फटका बसला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये विजय मिळवला. तब्बल २० वर्षांनंतर पुणे मतदारसंघात भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले. दरम्यान, विजयी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. पण त्यांनी त्याचवेळी भाजपचाही खास आपल्या शैलीत समाचार घेतला होता. यावरून अजित पवारांवर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.


“वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?,” असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांवर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला.