मौनी रॉयचा बोल्ड अंदाज पाहून घायाळ झाले फॅन्स


नुकताच एक शानदार बिकीनी फोटो अभिनेत्री मौनी रॉयने पोस्ट केला असून या फोटोमुळे मौनीची सोशल माडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या या फोटोतील परफेक्ट कर्वची चाहते भरभरून कौतुक करत आहेत. इन्स्टाग्रामवर मौनीने शेअर केलेल्या ती बिकीनी घालून एका रिक्लायनिंग चेअरवर लेटलेली या फोटोत दिसत आहे.


तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये शनिवार झोप घेण्यासाठी आहे आणि रविवार मिठी मारण्यासाठी आहे, असे म्हटले आहे. मौनीने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याला ७४५,५०० पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. मौनीच्या कामाबाबत सांगायचे झाले तर ती अयान मुखर्जीच्या अ‍ॅक्शन फँटसी ड्रामा ‘ब्रम्हास्त्र’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि तेलुगू सुपरस्टार नागार्जुन दिसणार आहेत. नुकतीच मौनी रॉय मालदीव्सला फिरायला गेली होती. तेथील तिचे बिकीनीचे फोटोही व्हायरल झाले होते.