अशाप्रकारे WhatsApp वर शेड्यूल करु शकता मेसेज


नवी दिल्लीः आपल्या जवळच्या व्यक्तीला जर आपल्याला वाढदिवसाच्या किंवा इतर शुभ दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आता तुम्ही व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्यूल करु शकता. कारण SKEDit या थर्ड पार्टी अॅपचा योग्य पद्धतीने वापर केल्यास सोप्या पद्धतीने व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्यूल करता येऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राला रात्री बारा वाजताच शुभेच्छा द्यायच्या असतात. पण त्यावेळी तुम्ही झोपेत असता. त्याचबरोबर शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला १२ वाजेपर्यंत जागे राहण्याची वेळ येते. पण आता सुविधेमुळे तुम्हाला जागे गरज नाही, कारण यापुढे तुम्ही मेसेज शेड्यूल करू शकता.

व्हॉट्सअॅपवर मेसेज शेड्यूल करणे सोपे झाले असून फेसबुक असो की जीमेल किंवा अन्य कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो त्यावर आता चुटकी सरशी मेसेज शेड्यूल करता येऊ शकतो. शेड्यूल केलेल्या वेळेत आपला मेसेज, मेल अथवा पोस्ट डिलिवर होत असते. आम्ही आज तुम्हाला अँड्रॉईड फोन आणि आयफोन्स मध्ये व्हॉट्सअॅपवर कसे मेसेज शेड्यूल करता येतील यासंदर्भातील माहिती देणार आहोत.

व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल करण्यासाठी अँड्रॉईड युझरला सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोरवर जावे लागेल आणि तिथून SKEDit अॅप डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा. त्यानंतर SKEDit अॅपवर साइन करा. SKEDit वर लॉग इन केल्यानंतर मेन मेन्यूमध्ये जाऊन व्हॉट्सअॅपवर क्लिक केल्यानंतर पुढची जी स्क्रीन दिसेल त्यात तुम्हाला SKEDit युज करण्यासाठी परवानगी द्यावी लागणार आहे. तसेच Use Service ला Allow म्हणावे लागेल. त्यानंतर तुम्हाला SKEDit च्या मदतीने ज्यांना मेसेज पाठवायचे आहे. त्यांना Add करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा मेसेज टाईप करा आणि schedule date and time करा. यात रिपीटचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे. तुम्ही याच्या मदतीने वारंवार मेसेज पाठवू शकता.

आयफोन युझरसाठी अॅप स्टोरवर व्हॉट्सअॅप मेसेज शेड्यूल करण्यसाठी कोणतीही थर्ड पार्टी अॅप उपलब्ध नसल्यामुळे युजर्सला सीरी शॉर्टकट द्वारे मेसेज शेड्यूल करता येऊ शकतात. यासाठी अॅप स्टोर वर जावून Shortcuts अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर अॅप उघडा. त्यानंतर खाली दिलेल्या Automation टॅबला सिलेक्ट करा. डाव्या बाजुला दिसत असलेल्या +icon वर क्लिक करा Create Personal Automation सिलेक्ट करा. यानंतर पुढील स्क्रीनवर ऑटोमेशन चालवण्यासाठी Time of Day वर टॅप करा. त्यात मेसेज पाठवण्यासाठी डेट आणि टाइम सिलेक्ट करा. हे सर्व झाल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. यानंतर सर्च मध्ये Add Action वर क्लिक करा आणि लिस्टमध्ये दिसत असलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करा. पुन्हा टेक्स्ट सेक्शनमध्ये मेसेज लिहा आणि +icon वर टॅप करून सर्च बारमध्ये व्हॉट्सअॅप शोधा. यानंतर तुम्हाला Send Message via WhatsApp दिसेल. यावर क्लिक करा आणि पुन्हा नेक्स्ट बटनवर क्लिक करा. यानंतर पुढील स्क्रीनवर तुम्हाला Done बटन दिसेल. यावर क्लिक करताच तुमचे काम फत्ते होऊन जाईल.