उद्यापासून सुरू होणार अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया


मुंबई – उद्यापासून म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. खुल्या गटात मराठा आरक्षित जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करू नये अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही. एसईबीसीमधून अ‍ॅडमिशन घेता येणार नाही, खुल्या प्रवर्गातून त्याऐवजी प्रवेश घेता येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले आहेत.