कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांची जामीनावर सुटका


मुंबई – विशेष एनडीपएस न्यायालयाने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांचा जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज प्रकरणात या दोघांनाही अटक करण्यात आली होती. ही कारवाई एनसीबीने केली होती. या दोघांना आता जामिनावर सोडण्यात आले आहे. भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने ड्रग्ज पेडलरने दिलेल्या माहितीनंतर धाड टाकली होती. एनसीबीला त्या धाडीत ८० ग्रॅमपेक्षा जास्त गांजा मिळाला होता.

कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी छापा टाकला. तिच्या घरात त्यावेळी अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे शनिवारी तिला एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने चौकशीत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर तिला एनसीबीने ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. ज्यानंतर या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. जो मंजूर करण्यात आला असून दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.