राज्याच्या पुनर्वसन मंत्र्यांनी दिले पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेत


मुंबई – कोरोनाचा कमी झालेला प्रार्दुभाव दिवाळीनंतर पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. राज्यातील रुग्णसंख्येने मागील आठवड्यात ५ हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे संकेत दिले आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जात असून आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढत होत असल्यामुळे सर्वोतोपरी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील. मुंबई कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. येथे अनेक राज्यांतील लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसेच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जात असून आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणे महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कोरोनाचा अटकाव केला गेला, तसे काम कुठेही झालेले नाही. मुंबईत एवढी गर्दी असतानाही राज्य सरकारने चांगले काम केले आहे. केंद्र सरकारनेही दाट वस्ती असलेल्या भागातील कामाचे राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचे आणि उपाययोजनांचेही कौतुक केल्याचे वडेट्टीवार म्हणाले.