व्हॉट्सअॅपवर खूप व्हिडिओ पाठवणाऱ्यांसाठी येत आहे खास फिचर


मुंबई – गेल्या आठवड्यात तीन नवीन फिचर्स लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने लाँच केले असून आता अजून दोन नवीन फिचर आणण्याच्या तयारीत व्हॉट्सअॅप आहे. Mute Video आणि Read Later नावाने हे दोन्ही फिचर येतील. यातील म्यूट व्हिडिओ हे फीचर अगदी नवीन असून Read Later हे फीचर ‘Archived Chats’ चे नवीन व्हर्जन आहे. हे दोन्ही फिचर व्हॉट्सअॅपच्या पुढील अपडेटमध्ये येण्याची शक्यता आहे.

या संदर्भात WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या म्यूट व्हिडिओ या फिचरवर व्हॉट्सअ‍ॅप काम करत आहे. युजर या फिचरद्वारे एखाद्याला व्हिडिओ पाठवण्याआधी तो म्यूट करु शकतील. म्हणजे तुम्ही जर म्यूट व्हिडिओ पर्यायावर टॅप करुन सेंड केल्यास तो व्हिडिओ समोरील व्यक्तीला विना आवाजाचाच सेंड होईल. स्टेटस सेट करतानाही हे फिचर उपयोगी पडेल. सध्या बीटा व्हर्जनमध्ये म्यूट व्हिडिओ फिचर देण्यात आले आहे.

या फिचरशी संबंधित एक स्क्रीनशॉट WABetaInfo ने शेअर केला आहे. त्यात व्हिडिओ लेंथच्या खाली व्हॉल्यूम आयकॉन दिसत आहे. त्यावर टॅप करुन व्हिडिओचा आवाज कमी-जास्त किंवा म्यूट करता येईल. अशाचप्रकारे स्टेटसवर एखादा व्हिडिओ सेट करताना तो व्हिडिओही म्यूट करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅप ‘Read Later’ हे फिचर ‘Archived Chats’ चे नवीन व्हर्जन आहे. युजर्स या फिचरद्वारे निवडक चॅट्सला पाहिजे तेवढ्या वेळ म्यूट करु शकतात. आपल्याला ज्या व्यक्तीचे मेसेज वाचायचे नाहीत किंवा ज्याच्याशी चॅटिंग करायची इच्छा नसेल, त्याचा कॉन्टॅक्ट Read Later पर्यायात अॅड करावा लागेल. त्यानंतर संबंधित कॉन्टॅक्टकडून मेसेज किंवा कॉल केल्यासही तुम्हाला कोणतेच नोटिफिकेशन मिळणार नाही.

सर्वात मोठा फरक Archived Chat आणि Read Later फिचरमध्ये म्हणजे Read Later मध्ये कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर नवीन मेसेज आल्यास नोटिफिकेशन मिळणार नाही. तर, Archived Chat मध्ये नवीन मेसेज येताच नोटिफिकेशन मिळते. Read Later ऑप्शनला युजर्स आपल्या इच्छेनुसार कधीही अनेबल किंवा डिसेबल करु शकतात.