
मुंबई – भाजप नेते राम कदम यांनी उद्या सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. जल्लोष साजरा करणार असल्याचे म्हटले आहे.
राम कदम उद्या ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत सिद्धिविनायक मंदिरात जाणार
भाजपने मंदिरं उघडण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरातच आंदोलन केले होते. तसेच महाराष्ट्रातील मंदिरे लवकरात लवकर उघडा, अशी मागणी मनसेनेही केली होती. तर दिवाळीनंतर मंदिरे उघडली जातील, असे संकेत ठाकरे सरकारने दिले होते. दरम्यान आता शनिवारी झालेल्या निर्णयानुसार राज्यातील मंदिरे उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून उघडली जाणार आहेत. कोरोना संकट आणि लॉकडाउनच्या ८ महिन्यांनंतर मंदिरे खुली होणार आहेत. सगळ्या प्रकारच्या कोरोना गाइडलाइन्स पाळूनच भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
