आता या नावाने ओळखले जाणार शिवाजी पार्क


मुंबईः अखेर दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचे नामांतर करण्यात आले असून यापुढे शिवाजी पार्क मैदान ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ या नावाने ओळखले जाणार आहे. या मैदानाला अलीकडेच महापालिकेच्या वतीने अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. मार्च महिन्यात या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव पालिका सभागृहात मांडण्यात आला होता.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात होतात. या मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचेही आयोजनही होते. शिवाजी पार्क असे नाव मैदानाला देण्याचा ठराव पालिका सभागृहात १० मे १९२७ रोजी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे.

माहिम पार्क असे शिवाजी पार्कचे पहिले नाव होते. मैदानाला शिवाजी पार्क असे नाव देण्याचा ठराव पालिका सभागृहात १० मे १९२७ रोजी मंजूर करण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मैदानाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्याची मागणी करण्यात येत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामकरण शिवाजी पार्कचे करण्यासाठी शिवसेनेने पालिकेकडे पाठपुरावा केला.