
अभिनेता, दिग्दर्शक व कॉरिओग्राफर प्रभूदेवा दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार असल्याच्या जोरदार चर्चा सिनेवर्तुळात रंगत आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आपल्या भाचीसोबत प्रभूदेवा रिलेशनशिपमध्ये असून त्याचा तिच्याशीच लग्न करण्याचा विचार आहे. पण अद्याप प्रभूदेवाकडून या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार प्रभूदेवा ?
पत्नी रामलताला २०११ मध्ये प्रभूदेवाने घटस्फोट दिला. प्रभूदेवा व दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या अफेअरच्या चर्चांना यादरम्यान उधाण आले होते. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणारा प्रभूदेवा आज जगातील सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरपैकी एक मानला जातो. त्याने डान्स आणि कोरिओग्राफीसोबतच अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातही चांगला जम बसवला आहे. सध्या ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत असून यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे.
