अमृता फडणवीस यांना मानसिक स्वास्थ जपण्याचा नीलम गोऱ्हेंचा सल्ला


मुंबई – अमृता फडणवीस यांच्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधत मानसिक स्वास्थ जपण्याचा सल्ला दिला आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा शवसेना’ असा उल्लेख ‘केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.


नीलम गोऱ्हे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यातून अमृता ताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा. मनस्वास्थ चांगले राहते, अशी टीका केली.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये, हो शिवसेनाच रुग्णवाहिका व अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते आजही हे देखील विसरु नका;आपल्या नावात”अ”च महत्व आहे ते निघाले तर”मृता” राहिल, शिवसेनेची काळजी करू नका,आपले मानसिक स्वाथ्य जपा”अ”मंगल विचार मनात आणणे”अ”योग्य बरे का !, असा चिमटा काढला.