1 कोटींच्या घड्याळांसाठी कृणाल पांड्याला भरावा लागणार एवढा टॅक्स!


आयपीएच्या 13व्या पर्वाचे जेतेपद पटकावताना मुंबई इंडियन्सने ऐतिहासिक कामगिरी केली. आयपीएलमधील त्यांचे हे पाचवे जेतेपद आहे आणि सर्वाधिक वेळा आयपीएलचा चषक उंचावण्याच्या पराक्रमात त्यांना आणखी एका चषकाची भर टाकली आहे. ही विक्रमी कामगिरी करून मायदेशात परतलेल्या मुंबई इंडियन्सच्या आनंदात मीठाचा खडा पडल्यासारखी घटना घडली. मुंबई इंडियन्सच्या संघातील प्रमुख खेळाडू कृणाल पांड्या याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी महसूल संचालनालय यंत्रणेकडून अडवण्यात आल्यानंतर दिवसभर कृणाल पांड्याचीच चर्चा रंगली.

युएईहून परतलेल्या कृणालने नियमापेक्षा अधिक सोने व महागडी घड्याळे आणली आणि विमानतळावरील महसूल संचालनालयाला त्याची कोणतीच माहिती दिली नाही. संचालनालयाला मिळालेल्या माहितीनूसार ही कारवाई झाली आणि 29 वर्षीय पांड्याला अडवण्यात आले. Audemars Piguet डायमंडची दोन आणि Rolex Modelsची दोन अशी एकूण चार महागडी घड्याळे त्याच्याकडे सापडली आणि त्याने त्याची माहिती महसूल विभागाला दिली नव्हती. जवळपास 1 कोटीच्या घरात या घड्याळ्यांची किमंत जाते. सायंकाळी 4.30 वाजला चार्टड विमानाने मुंबईत दाखल झालेल्या पांड्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली गेली. घड्याळे जप्त करूनत त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

हे प्रकरण मुंबई विमानतळाच्या कस्टम्स विभागाकडे व ती घड्याळं सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यावरील कर आणि दंड आता पांड्याला भरावा लागेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. घड्याळांच्या किमतीच्या 38.5 टक्के कर पांड्याला भरावा लागेल आणि ही रक्कम जवळपास 35 हजार एवढी होते.