ज्यूसबाबत सावध रहा


वजन कमी करण्यासाठी आणि उत्तेजक म्हणून फळांचे रस घेण्याचा प्रयत्न चांगलाच रूढ होत आहे. पण आहार तज्ज्ञांनी काही बाबतीत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. बिहारमधील नॅशनल डाएट ऍन्ड न्यूट्रीशन सर्व्हे या सरकारी पाहणीतून हाती आलेल्या निष्कर्षाच्या आधारावर हा इशारा देण्यात आला आहे.

फळांचे रस काढून ते प्रिझर्व्ह केले जातात आणि टेड्रा पॅकिंगमधून ते मॉलमधून विक्रीला ठेवले जातात. हे रस एकदाच आणून ठेवून ते सातत्याने पिण्याकडे लोकांचा विशेषत: तरुणांचा ओढा असतो. पण ज्यांना खरोखरच फळांचे फायदे करून घ्यायचे असतील त्यांनी हे बाजारातले रस आणण्याऐवजी ताजे फळ घेऊन त्याचा रस प्यावा. कारण बाजारातल्या रसात भरपूर साखर घातलेली असते. ती घातक ठरू शकते.

फळे खातानाही रस काढून तो पिण्यापेक्षा पूर्ण फळ (शक्य असल्यास सालीसह) खावे, कारण पूर्ण फळ खाल्ल्याने तंतुमय पदार्थ पोटात जातात. ते मल साफ करतात, त्यामुळे कर्करोगापासून बचाव होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment