अमित ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज


मुंबई : लीलावती रुग्णालयातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांना ताप येत असल्यामुळे खबरदारी म्हणून लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच त्यांच्या मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या होत्या. डॉक्टरांचे असे म्हणणे होते की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. पण, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी डॉक्टरांनी पुढील एक ते दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही दिली होती. तसेच त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे काहीही घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल होते.