राहुल गांधींनी खडसावल्यानंतरही माफी न मागण्याच्या निर्णयावर कमलनाथ निर्णयावर ठाम


नवी दिल्ली – महिला नेत्याचा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कलमनाथ यांनी आक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला असून याप्रकरणी कललनाथ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान कमलनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी आपल्याला त्यांची भाषा अजिबात आवडली नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे कमलनाथ हे राहुल गांधी यांनी खडसावल्यानंतरही माफी न मागण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.

कमलनाथ माझ्या पक्षातील आहेत, पण त्यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. ते कोण आहेत यामुळे फरक पडत नाही, पण त्यांचे मी अजिबात समर्थन करणार नाही. हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे. दरम्यान कमलनाथ यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ते राहुल गांधींचे वैयक्तिक मत आहे. ते वक्तव्य का केले यासंदर्भातील स्पष्टीकरण मी दिले आहे. ते वक्तव्य करताना त्यामागे काय संदर्भ होता याचे देखील स्पष्टीकरण मी दिले आहे. त्यात अजून काही सांगण्याचे कारण नाही.

यावेळी इमरती देवी यांची माफी मागणार का असे कमलनाथ यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, माझा जर कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता तर माफी का मागावी. जर कोणाला अपमानित वाटत असेल तर मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजपने ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघात इमरती देवी यांना उभे केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे साधे असून, इमरती देवी यांच्यासारखे ‘आयटम’ नसल्याचे वक्तव्य रविवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेतील भाषणात कमलनाथ यांनी केले होते.