रेमडिसिव्हरचा कोरोनाबाधितांवर अत्यंत अल्प परिणाम – WHO


नवी दिल्ली – कोरोनाबाधित रुग्णांवर अँटी व्हायरल ड्रग रेमडिसिव्हरचा अत्यंत अल्प असा परिणाम दिसून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. रेमडिसिव्हरमुळे रुग्ण बरे होण्याचा कालावधी किंवा मृत्यूची शक्यताही कमी होत नाही. 30 पेक्षा अधिक देशांमधील 11,266 रुग्णांवर जागतिक आरोग्य संघटनेने रेमडिसिव्हर, hydroxychloroquine, anti-HIV drug combination lopinavir/ritonavir and interferon या औषधांचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगातून आलेल्या निष्कर्षानुसार, रेमडिसिव्हरचा कोरोनाबाधित रुग्णांवर होणारा परिणाम अत्यंत अल्प आहे. दरम्यान, हे औषध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यावर देण्यात आले होते.

कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रुग्णांमध्ये या औषधाचा अगदी अत्यंत अल्प किंवा नगण्य स्वरुपाचा परिणाम रुग्णांवर दिसून येतो. दरम्यान, या ट्रायल्सचे रिझल्ट पुन्हा एकदा तपासण्यात येणार आहेत. रेमडिसिव्हर औषधांच्या परिणामांचा अमेरिकेतील Gilead यांनी अभ्यास केला होता. त्यानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांची रिकव्हरी या औषधामुळे 5 दिवस लवकर होते, असे Gilead यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते. रॉयटर्सला Gilead यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेकडून येणारा डेटा विसंगत आहे. वेगवेगळ्या अभ्यासातून आणि काही जर्नल्समधून रेमडिसिव्हरचे फायदे समोर येत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सौमय्या स्वामीनाथन यांनी बुधवारी सांगितले की, hydroxychloroquine आणि lopinavir/ritonavir या औषधांचे काहीच परिणाम दिसून न आल्याने जूनमध्ये त्यांच्या ट्रायल्स थांबवण्यात आल्या. इतर औषधांचे ट्रायल्स 30 पेक्षा अधिक देशांमध्ये 500 विविध हॉस्पिटल्समध्ये सुरु आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये बनवलेल्या नवीन अँटी व्हायरल ड्रग्स आणि monoclonal anti-bodies यांच्यावर आम्ही अधिक भर देत आहोत. त्यावरुन आपल्याला पुढचे पाऊल ठरवता येईल. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडून 1 मे रोजी रेमडिसिव्हर या औषधाला मंजूरी देण्यात आली होती, त्यानंतर हे औषध विविध देशांमधील कोरोनाबाधितांवर वापरण्यात येत आहे.