संजय दत्तने शेअर केला नवा व्हिडीओ, तुम्ही देखील व्हाल भावूक


गेल्या काही दिवसांच्या उपचारानंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरशी झुंज देत असलेला बॉलीवूडचा मून्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त काहीसा अशक्त दिसू लागला आहे. पण अद्याप त्याने हार मानलेली नाही. त्यातच आता त्याने नवा व्हिडीओ शेअर करत कॅन्सरला पराभूत करण्याचे म्हटले आहे. मी लवकरच कॅन्सर मुक्त होईल, असे या व्हिडीओत संजय दत्त म्हणतो आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर हेअर स्टाइलिस्ट अलिम हकीमने शेअर केला आहे. संजय या व्हिडीओत सलूनमध्ये आहे आणि नवी हेअरकट केल्यानंतर व्हिडीओत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. हाय, मी संजय दत्त. सलूनमध्ये परतल्यावर छान वाटले. केस कापण्यासाठी मी आलो आहे. पण तुम्ही पाहू शकत असाल तर हे माझ्या आयुष्यातला नवीन डाग आहे. पण मी लवकरच कॅन्सरवर मात करेन, असे संजय दत्त या व्हिडीओत म्हणत आहे.

View this post on Instagram

My day just got better with @duttsanjay entering our Salon HA… It’s always such a delight to see him but today was something else…. A whole lot of emotions caught up as we go a long way and share such beautiful memories together.❤️ Sanjay Dutt at Salon Hakim’s Aalim after getting a haircut done with all the necessary precautions Instructed by the government and the experts. #SanjayDutt #AalimHakim #Rockstar #SalonHakimsAalim #TeamHA #SafetyFirst #Precautions #Hygiene #SocialDistancing #NewNorms #TeamHakimsAalim #SalonLife #Viral #Trending #MovieLife #razorcuts #ActorsLife #fighter #warrior #babarocks #friends #menshair #mensfunkyhairstyle #funkyhaircolouring #legacy #habarberingcompany💈 @duttsanjay @aalimhakim

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim) on


या व्हिडीओत हेअर स्टाईलिस्ट अलिमबाबतही तो सांगताना अलिम आणि माझी खूप जुनी ओळख आहे. त्याचे वडील माझ्या वडिलांचे केस कापायचे. हकीम साहब ‘रॉकी’ या चित्रपटासाठी माझे हेअरस्टायलिस्ट होते. आता अलिम माझा स्टायलिस्ट आहे. नवीन हेअरस्टाईल करायची झाल्यास तो मला बोलावतो, असे संजय दत्त सांगत आहे.

आजतकच्या वृत्तानुसार संजय दत्तला त्याच्या मुलांची काळजी सतावते आहे. सुरुवातीला जेव्हा संजय दत्तचे रिपोर्टसमोर आले तेव्हा त्याला धक्का बसला होता काही दिवसांनी या आजाराला संजयने स्वीकारले आणि त्याच्याशी लढायला तयार झाला.