अमेरिकेतील आणखी एका कंपनी थांबवली कोरोना प्रतिबंधक औषधाची चाचणी


वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी अनेक संशोधक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यातच काल अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने आपल्या कोरोना लसीची चाचणी थांबवल्यानंतर आता आणखी एका औषधाची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. मागच्या २४ तासात अमेरिकेत निर्णायक टप्प्यावर असलेल्या दोन औषध चाचण्यांना सुरक्षेच्या कारणास्तव ब्रेक लागल्यामुळे कोरोना विरोधात प्रभावी औषध निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधकांना हा एक प्रकारचा झटकाच आहे.

अँटीबॉडी उपचार चाचणी अमेरिकन औषध कंपनी एली लिलीने थांबवली केली आहे. एली लिलीकडून हॉस्पिटलमधील रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यातील अँटीबॉडी उपचार चाचणी सुरु होती. त्याआधी अमेरिकेतील दुसरी मोठी औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लसीच्या चाचण्या थांबवल्या आहेत.

अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सनकडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होती. ६० हजार स्वयंसेवकांना या टप्प्यात सहभागी करुन घेण्यात आले. पण एका स्वयंसेवकांच्या शरीरावर लशीचा डोस दिल्यानंतर दुष्परिणाम दिसल्याने जॉन्सन अँड जॉन्सनने चाचणी थांबवली. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या थांबवल्या आहेत. त्याचा कदाचित लसीशी संबंध नसेल, असे जॉन्सन अँड जॉन्सनचे संशोधन प्रमुख माथाई माममेन यांनी गुंतवणूकदारांना सांगितले. यासंदर्भातील वृत्त एएफपीने या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ब्रिटीश कंपनी अस्त्राझेनेकाने मागच्या महिन्यात ऑक्सफर्डच्या लसीचा डोस दिल्यानंतर एका स्वयंसेवकाच्या शरीरावर दुष्परिणाम दिसल्यानंतर चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचण्या नंतर सर्वत्र सुरु झाल्या. पण अमेरिकेत अजूनही या लशीच्या चाचण्या बंद आहेत. त्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

एली लिलीने ऑगस्ट महिन्यापासून अमेरिका,डेन्मार्क, सिंगापूरसह ५० ठिकाणी अँटीबॉडी उपचार चाचण्या सुरु केल्या होत्या. या चाचण्या १० हजार रुग्णांवर करण्याचे उद्दिष्टय आहे. या अँटीबॉडीची निर्मिती प्रयोगशाळेमध्ये करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये अँटीबॉडी उपचारांना परवानगी मिळावी, यासाठी मागच्या आठवडयात एली लिली आणि रेगेनरॉनने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता.