या मालिकेद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘शेवंता’


मुंबई : झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले २’ मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. संपूर्ण महाराष्ट्र शेवंताच्या अदांवर भाळला होता. पण या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. तेव्हापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण आता त्याच शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर तितक्याच मादक व्यक्तिरेखेत शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुनरागमन करणार आहे.


अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर झी युवावरील आगामी मालिका ‘तुझं माझं जमतंय’ मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पम्मी हि व्यक्तिरेखा या मालिकेत अपूर्वा साकारणार आहे. अपूर्वा पम्मी या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झाली आहे. विनोदी अशी या मालिकेची शैली असून या मालिकेला पम्मी ही ग्लॅमरचा तडक देणार आहे. हि मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. ही मालिका प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर ४ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.