केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन


नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले असून मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती मुलगा चिराग पासवान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.


चिराग पासवान यांनी बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात, अशा आशयाचे ट्विट केले आहे.